Uncategorized

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सपोनि रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिसांचा शहरातून रुट मार्च

(नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करणार: सपोनि रविंद्र भोरे यांचा इशारा

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलिसांचा शहरातून रुट मार्च

रघुनाथ थोरात

उंब्रज ता. कराड येथील पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मंगळवारी उंब्रज शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये मंगळवारी रूट मार्च घेण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महिला पोलिस , गृह रक्षक दल अधिकारी व जवान या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
गणेशोत्सव आगामी सण उत्सव काळात उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने उंब्रज पोलिसांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या विविध बैठका घेवून जिल्हाधिकारी सातारा यांनी जाहीर केलेल्या नियमावली व उत्सव काळात घ्यावयाची काळजी या अनुषंगाने मंडळानासुचना केल्या आहेत. तसेच नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला आहे.
दरम्यान बुधवारी सर्वत्र गणेशाची स्थापना होत असून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सपोनि रविंद्र भोरे यांच्यासह पोलिसांनी  रुट मार्च काढण्यात आला. उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत आगामी गणेशोत्सव, मोहरम या अनुषंगाने  उंब्रज बाजारपेठ, सेवा रस्ते, लोकवस्ती व रहदारीचे अंतर्गत रस्ते, पाटण तिकाटने, सेवा रस्त्याने हा रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी , गृह रक्षक दल जवान हजर होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button