Uncategorized

कराड उत्तरचे युवा नेते सागर पाटील यांची जगदीश येळवे यांच्या घरी सांत्वनपर भेट

कराड उत्तरचे युवा नेते सागर पाटील यांची जगदीश येळवे यांच्या घरी सांत्वनपर भेट

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी,ता.कराड गावचे रहिवासी,
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक जगदीश विष्णू येळवे यांचे वडील कै विष्णू दादा येळवे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा उत्तर कार्य विधी संपन्न झाला. यानिमित्त परिवाराचे सांत्वन करण्यासाठी व मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यासाठी कराड उत्तरचे युवा नेते व आदरणीय पी डी पाटील साहेब सहकारी बँकेचे संचालक मा सागर पाटील(दादा) यांनी जगदीश येळवे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.याप्रसंगी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयंतराव जाधव, शिवाजीनगरचे सरपंच सचिन पवार,कळंत्रेवाडीचे सरपंच शंकर बाकले,धीरज थोरात,सत्यवान चव्हाण,सयाजी येळवे तसेच संपूर्ण येळवे परिवार,मित्रपरिवार,ग्रामस्थ व आप्तेष्ट उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button