Uncategorized

कोर्टीच्या आदर्श महिला ग्रामसंघाने केली विक्रमी उलाढाल

('उमेद' मुळे महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल)

कोर्टीच्या आदर्श महिला ग्रामसंघाने केली विक्रमी उलाढाल
(‘उमेद’ मुळे महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल)

रघुनाथ थोरात

कोर्टी,ता.कराड येथील आदर्श महिला ग्रामसंघातील महिलांनी एकत्र येत गौरीच्या फराळाचा व साहित्याचा स्टॉल लावला आहे. विशेष बाब म्हणजे सदर स्टॉलच्या माध्यमातून जवळपास तीस हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री करत आदर्श महिला ग्रामसंघाने विक्रमी उलाढाल केली आहे. त्यामुळे महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘उमेद’ अभियानामुळे उंब्रज-पाल प्रभागात ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचे सर्व श्रेय उंब्रज-पाल प्रभागाच्या समन्वयक माधवी वनारसे तसेच कराड तालुका व्यवस्थापक निलेश पवार यांना जाते,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोर्टी येथील आदर्श महिला ग्रामसंघाच्या मयूरी यादव,सारिका यादव, नीलम यादव,शीतल यादव, वैशाली यादव,सुमन यादव या सहा महिलांनी एकूण पंधरा प्रकारचे पदार्थ तयार केले होते. त्यामध्ये दोनच दिवसात जवळपास तीस हजार रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. दरम्यान, या उपक्रमास तालुका व्यवस्थापन कक्षाचे निलेश पवार तसेच प्रभाग समन्वयक माधवी वनारसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी ग्रामसंघाचे पदाधिकारी तसेच समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button