ध्येय निश्चित करून आपल्या जीवनाचा प्रवास करा – पी आय महेश पाटील
नेवासा – आज नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुळा एज्यूकेशन सोसायटी चे ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम दान हिवाळी शिबीर सांगता प्रसंगी नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी ते बोलत असताना म्हणाले कि, विदयार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने आपली वाटचाल केली पाहिजे.
स्पर्धा परीक्षा देताना येणारे विविध आव्हाने, समाजात दैनंदिन जीवन जगाताना वेगवेगळ्या आव्हानांना कसे सामोरे जावे, विद्यार्थी जीवनात शिस्त किती महत्वाची आहे, आपले दैनिक वेळापत्रक बनवायला हवे, विद्यार्थी यांनी आपल्या जीवनात तीन कामे करावे अभ्यास, शारीरिक कसरत,संस्कार ही त्रिसूत्री वर आपले जीवनाची वाटचाल केल्यास नक्कीच तुम्ही समाजासाठी आदर्श बनणार असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
यावेळी त्यांनी उपस्थित विदयार्थ्यांना असलेले प्रश्न व त्यावर त्या प्रश्न चे निरसन साहेबांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना प्रा नवनाथ आगळे सर यांनी केले
यावेळी स्वयंभु त्रिवेणीश्वर देवस्थान चे महंत रमेशनणंद गिरी महाराज, यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, श्रमदान, आई वडिलांचा आदर व सामाजिक जबाबदारी यावर भाष्य केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ कार्तिकी नांगरे यांनी केले.
विद्यार्थ्यांपैकी चौरे अजित, सदाफळ अनुष्का, बोलके वेदांत, दारून्टे भारती, हपसे विशाल, सलमान शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे,बाळासाहेब पिसाळ, किरण जाधव, संकेत वाघमारे, कुणाल पिसाळ, राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी नवनाथ आगळे, गणेश गारुळे सर, कार्तिकी नांगरे, शेख सर, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होतें.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गारुळे यांनी केले.




